गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदूरवादा मंडळातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी बहुवार्षिक पिकांच्या प्रलंबित अनुदानासाठी सोमवारी (दि.८) तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व निदर्शने केली.
तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
परिसरातील शेतकऱ्यांचा बहुवार्षिक पिकांच्या अनुदानाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला होता. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर धडक दिली. यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
ग्रामस्तरीय समितीमार्फत उद्यापासूनच म्हणजेच ९ डिसेंबरपासून पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पाहणी अहवालानूसार पिकांची खात्री करून अनुदानाबाबतची योग्य कार्यवाही पुढील आठ दिवसांत पूर्ण केली जाईल, असे ठोस आश्वासन तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाहणी करून आठ दिवसांत कार्यवाही
दिले.
या सकारात्मक चर्चेनंतर शेतकरी बांधवांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनात राहुल पाटील ढोले, बदाम शेवाळे, ज्ञानेश्वर गावंडे, गोकुळ गावंडे, रवींद्र खरात, मच्छिंद्र दाने, भागवत बोरुडे, सोपान शेवाळे, दीपक शिलेदार, अरुण गावंडे, लखन गावंडे, विठ्ठल गवळी, संतोष गावंडे, रामेश्वर गावंडे, रामेश्वर शेवाळे, बबलू शिलेदार, राजेंद्र गावंडे, सचिन सभादिंडे, श्रीराम वल्ले, शिवाजी गावंडे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














